अंतरी विझल्या व्यथा (गझल)गालगा ललगा लगागा गालगा ललगा गागाआसवे ढळताच गाली कोरड्या भिजल्या व्यथा.पेटत्या सरणात आता पेटुनी थिजल्या व्यथा.मोगरा खुलताच ओठी लाजली हळवी नीशा.ती नशा भिनताच गात्री कोवळ्या निजल्या व्यथा.
हुंदका फुटताच पानी जाहल्या हिरव्या दीशा.त्या दिशा रुजवून दारी अंगणी भिनल्या व्यथा.फाटक्या पदरात मी ही पोसते परक्या जीवा.गोडवा सिमटून पोटी हासुनी मिटल्या व्यथा.सोडूनी उपभोग आता लाविला भगवा टीळा.गुंतुनी वणव्यात त्याच्या चंदनी झिजल्या व्यथा.सावळ्या तिमिरात का रे काजळे जळता दीवा?काजळी बिलगून देही अंतरी विझल्या व्यथा.संचिता कारखानीस.
No comments:
Post a Comment